Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 PM : 20 August 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 PM : 20 August 2024 : ABP Majha

तब्बल १२ तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, काही आंदोलक ताब्यात

आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशनबाहेरील वाहनांची तोडफोड. जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खासगी गाडीही फोडली

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांवर आंदोलकांची दगडफेक, दगडफेकीत पोलीस जखमी

चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर बदलापुरात उद्रेक...आरोपीला आमच्यासमोर आजच फाशी द्या, आंदोलकांची संतप्त मागणी 

चिमुरड्यांवरच्या अत्याचारविरोधांत बदलापूरकरांची एकजूट...लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, मुलींना सुरक्षा द्या, आंदोलकांची भावना 

आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन

बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल निलंबित.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, १० दिवसांत चार्जशीट दाखल करणार 

आंदोलनानंतर बदलापूर स्थानकात ट्रायल इंजिन..चाचणी यशस्वी झाल्यावरच नियमित लोकल सोडणार


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram