Top 100 News : 100 नंबरी बातम्या : 12 जून 2024 : बुधवार : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राला केंद्राकडून केवळ ८ हजार कोटी, यूपीला २५ हजार कोटी, बिहारला १४ हजारकोटींचा निधी, निर्मला सीतारमण यांनी पदभार स्वीकारल्यावर जाहीर केला विकास निधी.
राज्यसभेच्या जागेसाठी आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळांचं नाव चर्चेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा, वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेते उपस्थिती लावणार.
उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बोलावली बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्कप्रमुखांशी संवाद साधणार. आज दुपारी साडेबारा वाजता सेना भवन येथे होणार बैठक
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार.
नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान, गडकरींनी आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारला