Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 29 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 29 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच वाजेपर्यंतची मुदत...मात्र महायुती आणि मविआमध्ये काही जागांचा तिढा कायम...काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात, नवाब मलिक उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल, मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी चर्चा, विधानपरिषदेचं आश्वासन, पत्नीची माहिती

शरद पवारांनी ऐनवेळी मोहोळ मतदारसंघाचा उमेदवार बदलला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सिद्धी कदम यांच्या जागी राजू खरे यांना संधी

बारामतीत भाषणादरम्यान कडक स्वभावाचे अजित पवार भावूक..आता साहेबांनी घरात फूट पाडली असं म्हणायचं का? अजितदादांचा शरद पवारांना सवाल...

दिवाळीत फटाके रात्री दहा पर्यंतच वाजवा, वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचं आवाहन 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram