
TOP 100 | टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha
दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या पाच वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव, आझाद चौकातील फर्निचरच्या दुकांनाना आग, 100 पेक्षा अधिक दुकाने जळून खाक
मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल, अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश
नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांना सावज केल्याचं एफआयआरमध्ये नमूद, तातडीनं चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश
मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिस अपयशी, १०० दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा
सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, सुरक्षारक्षकाचा जबाब एबीपी माझाच्या हाती,
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटणार,
विधान परिषद सभापतींचा पक्षपातीपणा आणि नागपूर हिंसाचारावर मागणार दाद.. आज सभागृहात काळ्या फिती लावून कामकाज
कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याच्या तयारीत, तातडीच्या सुनावणीसाठीही प्रयत्नशील
पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅवलर जळून खाक, बारा कर्मचाऱ्यांपैकी चौघांचा होरपळून मृत्यू.. आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, तर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा, निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी विलिनीकरण करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे, नियमित कर्णधार हार्दिक पंड्या सामन्याला मुकणार, गेल्य़ा मोसमातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला झालेली सामनाबंदीची शिक्षा
---------------------------------
((आयपीएलच्या सलामीला मुंबईचा कॅप्टन सूर्या))
पुतीन यांच्याशी चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींशी चर्चा..
शांततेसाठी निर्णायक चर्चा झाल्याचा ट्रम्प यांची माहिती तर तर युद्धविरामासाठी झेलेंस्कीही सकारात्मक
गाझापट्टीवर इस्रायलचे हल्ले अजूनही सुरुच.. चारशे छत्तीस जणांचा हल्ल्यात मृत्यू.. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा, सर्व ओलिसांची सुटका होईपर्यंत हल्ले थांबणार नसल्याचा इस्रायलचा पुनरुच्चार