TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 22 May 2024 : ABP Majha
राज्यातल्या निवडणुका संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, आज आणि उद्या फडणवीस यांच्या दिल्लीत सभा, रोड शोही होणार.
पुण्याच्या अपघात प्रकरणातील आरोपीचे वडिल विशाल अगरवाल यांना आज कोर्टात हजर केलं जाणार, अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून करण्यात आली होती अटक.
पुणे अपघात प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे पोलिसांना सूचना.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया, तर या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार. पत्रकार परिषद घेत फडणवीसांची घोषणा
पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघाताची घटना गंभीर, आरोपीची सहज सुटका मान्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया, पोलिसांनी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचीही फडणवीसांची माहिती.
अपघातप्रकरणी राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून योग्य ती कारवाई करा, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन दिल्या सूचना.