Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजलं असून राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम (Assembly Election) पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच यंदा राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांच्या वतीनं आपापल्या परीनं मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता महाविकास आघाडीकडून बीड जिल्ह्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. 

बीड जिल्ह्यातील सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर एका म्हणजे, गेवराई विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून परळी विधानसभा मतदारसंघ, केज विधानसभा मतदारसंघ, माजलगाव विधानसभा मतदारसंघ, बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram