Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :27  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या (Maharashtra CM) शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.  'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram