Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला आहे. आज सकाळी(शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीमधील सर्व नेते, माझ्या पक्षाचे नेते या सर्वांचे मी आभार मानतो. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे शंका नव्हती पण सगळ्यांना जागा हवी असतात. आता उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे महायुतीतील सर्वजण प्रचार करतील, आदेश आला की सर्वजण काम करतील. कल्याणी नगर अपघात प्रकरण सर्व क्लिअर झाले आहे. सगळे नेते येतील प्रचाराला येतील. 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. जगदीश मुळीक यांच्यासह सर्वांची भेट घेणार आहे. ते जेष्ठ नेते आहेत, असंही यावेळी टिंगरे म्हणालेत.