Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात सीटिंग गेटिंग फॉर्म्युलाचे पालन केले जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्याचवेळी वेळ पडल्यास पक्षासाठी त्याग करण्याची आपली तयारी असल्याचेही बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी स्पष्ट केले. मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही. 15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मात्र, कामठी विधानसभा मतदारसंघात (Kamthi Vidhan Sabha) कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी बजावेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत भाजपच्या सीटिंग आमदार बद्दल तसेच ज्या जागांमध्ये आम्ही strong आहोत, मात्र फार कमी मतांनी पराभूत झालो होतो, अशा जागांबद्दल चर्चा होईल. काही उमेदवारांची नावे अंतिम होतील. त्यानंतर टप्याटप्प्याने पुढील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मात्र, आजच्या बैठकीत सर्व नावांवर चर्चा होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.