Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
हेही वाचा :
राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेलो पोहोचला आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. त्यामुळेच सध्या राज्यातील राजकारणा चांगलेच ढवळून निघालेले आहे. प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच भाजपाने नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर केलेल्या टीकेतून त्याचीच प्रचिती येत आहे. नितीन राऊत हे ताजमहल मीच बांधला आहे, असं सांगतील, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय. काम काहीच करत नाहीत, पण एक पत्र देतात आणि... देवेंद्र फडणवीस काल उत्तर नागपूर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या भाजपचे उमेदवार डॅा. मिलिंद माने यांच्या प्रचारसभेत बोलत होते. एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची एक विशेषता आहे. काम काहीच करत नाहीत. पण एक पत्र देतात आणि म्हणतात हे काम मीच केलं आहे. ते तर बॅकडेटेडमध्ये पत्र देऊन ताजमहाल मीच बांधला असं सांगतील. ताजमहल बांधण्याची माझीच मागणी होती असं म्हणतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.