ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 November 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 November 2024

महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, देवेंद्र फडणवीसांची घोषणा...तर मविआचं सरकार पाडलं नसतं तर पुन्हा कर्जमाफी दिली असती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य...

निवडणुकांच्या नावाखाली काँग्रेसकडून वसुली सुरू, अकोल्यातील सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल तर मतांचं विभाजन करुन काँग्रेस जातीजातीत वाद लावतेय, मोदींचा आरोप

२०१२ मध्ये आपल्या एन्काऊंटरचा डाव होता, सदाभाऊ खोतांचा माझा कट्टावर गौप्यस्फोट, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थन

महाविकास आघाडीचा जाहीरनामा उद्या प्रकाशित होणार, मुंबईत मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत प्रकाशन, राऊत, जयंत पाटलांसह पत्रकार परिषद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद...शाहांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता

यावेळी आपण सत्तेत असू आणि मंत्री असू, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विश्वास...म्हणाले शरद पवार आणि उद्धव ठाकरे घरी येऊन विनंती करतील...एबीपी माझाला विशेष मुलाखत...

आदित्य ठाकरेंची वरळीत प्रचार रॅली, शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह, आदित्य ठाकरेंकडून मतदारांच्या भेटीगाठी

विक्रोळी मतदारसंघावरुन राज ठाकरेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका..सकाळच्या पत्रकार परिषदेवरुन हल्लाबोल तर भाजपच्या नादाला लागलेल्यांवर काय बोलणार म्हणत राऊतांचा पलटवार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram