Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 25 ऑगस्ट 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 25 ऑगस्ट 2024: ABP Majha
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यानंतर पोलीस प्रशासनाचा कुर्मगतीने आणि संशयास्पद कारभार सध्या टीकेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारने आता यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून आरोपीला कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यापूर्वी पोलीस मुलीच्या आई-वडिलांशी कसे वागले, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात कशी दिरंगाई झाली, याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. साधारण 14 ऑगस्टला हा सगळा प्रकार मुलीच्या आईवडिलांच्या लक्षात आला. शाळेतील एका दुसर्या मुलीसोबतही तसाच प्रकार घडल्याचे त्यांना समजते. मात्र, शाळेकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, त्यासाठी चिमुरडी मुलगी आणि तिच्या पालकांना अनेक तास पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागले. 13 ऑगस्टला नेमकं काय घडलं? मुलीच्या आईने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, माझ्या मुलीबरोबरची शाळेतील मैत्रीण आहे. तिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. पण तिला ताप आल्याचे कारण देत ती शाळेत येत नव्हती. 13 तारखेला ती शाळेत गेली नव्हती. माझी मुलगी त्यादिवशी शाळेत गेली होती. शाळा सुरु झाल्यावर मला काहीवेळाने शिक्षकांचा फोन आला. तुमची मुलगी खूप रडतेय, काही केल्या ती रडायची थांबत नाही. तुम्ही तिला शाळेत घ्यायला या, असे शिक्षकांनी मला सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करुन तिला शाळेत जायला सांगितले. मला परत मॅडमचा फोन आला, ती रडायची थांबत नाही. कान दुखतोय, असे सांगतेय. तोपर्यंत माझे वडील शाळेत पोहोचले. त्यांच्याबरोबर माझी मुलगी वर्गातून बाहेर पडली. ती माझ्या वडिलांचा हात धरून चालत होती. तिची पावलं वाकडीतिकडी पडत होती. ती शाळेत होताना व्यवस्थित होती, पण आता वाकडीतिकडी चालते, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आले. तिला घरी गेल्यावर ताप आला. 14 तारखेला आम्ही तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला.