Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अनेक जाहीर सभा महाराष्ट्रात झाल्या. मात्र त्यांनी एकाही सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली नाही. हाच धागा पकडत, शरद पवारांनी मिश्किल टीपणी केलीय. मोदी माझ्यावर टीका करत नाहीत हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलंय.  अजित पवार (Ajit Pawar) यांना पाडा असं आवाहन तुम्ही बारामतीकरांना करणार का, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का, वोट जिहादचा मुद्दा, प्रतिभा पवार प्रचारात कशा, अशा अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी मतं मांडली.

शरद पवार म्हणाले, मोदी माझ्यावर टीका करत नाहीत ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या निवडणुकीत ज्या ज्या वेळी मोदी आले,माझ्यावर टीका केली आणि आमच्या जागा वाढल्या. म्हणूनच मी त्यांना निमंत्रण दिले की, मोदीजी, महाराष्ट्रात या आणि तुमच्या मन की बात बोला. त्यामुळे आमच्या जागा वाढतील. पण त्यांच्या सल्लागाराने सांगितले असावं की शरद पवारांना महाराष्ट्रात भाष्य करू नका. माझ्यावर बोलणे बंद आहे, पण राहुल गांधी आणि इतर नेत्यांवर टीका करणं सुरुच आहे. जसं प्रधानमंत्रीपदाचा सन्मान आम्ही ठेवला पाहिजे, तसचं विरोधी पक्षनेता पदाचा मान त्यांनी ठेवला पाहिजे. मोदी येतात आणि राहुल गांधींवर टीका करतात. हे लोकांना आवडत नाही"

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram