Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 8 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

अनेक वर्षांच्या प्रयत्नाने अखेर मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झालीये. अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला. याच प्रयत्नाला यश मिळत केंद्र सरकाराचा हा निर्णय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे. या निर्णयावर महाराष्ट्रातील सामान्य जनेतपासून ते अगदी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक सर्वच स्तरातून प्रतिक्रिया समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, या सगळ्यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोकसभेच्या निवडणुकांदरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही मागणी अग्रस्थानी होती. त्याचाच आधार घेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.                                        

तेजस्विनीची पोस्ट काय?

तेजस्विीनी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे राखणदार...प्रिय मराठी भाषा, 21 व्या शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होणाऱ्या आमच्या पिढीला मातृभाषेचा फक्त जाज्वल्य नाही तर हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा ते आम्हाला ह्या माणसाने शिकवलं...राजसाहेब!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram