Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 20 October 2024: ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 20 October 2024: ABP Majha
महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पुर्ण ...आज किंवा उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता
महायुतीत २६५ पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित...शेवटच्या १० ते १५ जागांवर तिढा असल्याची माहिती...येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय, शिंदे-फडणवीसांची माहिती...
भाजपाची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची शक्यता... 100 नावांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची महिती
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५८ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती...अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही...२७ उमेदवार निश्चित होणं बाकी...
नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह थोरातांची आज दिल्लीवारी... जागावाटपासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक... १० वाजता पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंसोबत चर्चा करणार
महाराष्ट्रात उशीरा निवडणुका जाहीर करणं हे नव्या राष्ट्रपती राजवटीचं षडयंत्र, खासदार संजय राऊत यांचा रोखठोकमधून गंभीर आरोप, २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्यासाठी फक्त ४८ तास शिल्लक राहणार असल्याचा दावा