TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 30 May 2024

Continues below advertisement

उष्णतेची काहिली सहन करणाऱ्यांसाठी खुशखबर, मान्सून केरळात दाखल, ८ जून मुंबई, तर १५ जूनपर्यंत राज्य व्यापणार

येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता, राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता

लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार, १ जूनला अखेरच्या टप्प्यात ८ राज्यात ५७ जागांवर मतदान, ४ जूनला एबीपी माझावर महानिकाल

महाडमध्ये आंदोलन करताना आव्हाडांकडून डॉ.आंबेडकरांचा फोटो असलेलं पत्रक फाटलं, आव्हाडांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, आव्हाडांच्या माफीनाम्यानंतरही भाजप आज राज्यभरात आंदोलन करणार

ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात वैद्यकीय शिक्षण विभागाची मोठी कारवाई, डॉ. अजय तावरेही निलंबित 

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईचीही चौकशी होणार, डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप, पोलिसांकडून शिवानी अगरवालचा शोध सुरु

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट करा, अंजली दमानियांची मागणी, तर नार्को टेस्टला तयार अजित पवारांचं दमानियांना प्रतिआव्हान

मुख्यमंत्री शिंदेंकडून खासदार संजय राऊतांना मानहानीची नोटीस, ३ दिवसात माफी मागण्याची मागणी, सामनातल्या लेखाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून कायदेशीर पाऊल

मध्य रेल्वेवर १ आणि २ जूनला महामेगाब्लॉक..शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या ७२ एक्स्प्रेस रद्द, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी ३६ तासांचा ब्लॉक.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram