Top 100 Headlines | Superfast News | 10AM 27 June 2024 | Mansoon Assembly | Marathi News | ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines | Superfast News | 10AM 27 June 2024 | Mansoon Assembly | Marathi News | ABP Majha

आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर.

महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं  शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.

मुंबईच्या ताज लँड येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून सर्व आमदारांना  मार्गदर्शन,अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारा,बैठकीत चर्चा

आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरू,शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे, कायदा सुव्यवस्था यासोबत इतरही महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर,सुनिल प्रभुचं वक्तव्य.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार, राष्ट्रपती सांगणार सरकारच्या पुढील 5 वर्षांचा रोडमॅप.

राज्यसभेचे अधिवेशनही आजपासून सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो,  विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली, 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत.

विधानपरिषदेतील ५ आमदारांचा आज निरोप समारंभ, शिवसेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार निवृत्त होणार.(( नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बाजोरिया प्रविण पोटे, सुरेश धस यांचा निरोप समारंभ.))

मंत्रालयातील प्रवेश आणखी कठोर, खाजगी व्यक्तींना मंत्रालयात वाहन आणण्यासाठी फक्त ३ तासांचीच मुभा, दुपारी २ ते ५.३०वाजेपर्यंत वाहन मंत्रालयात आणता येणार. गृह विभागाने नव्याने जारी केले आदेश. 

सर्वात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला,  

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram