TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 30 May 2024 | ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 30 May 2024 | ABP Majha
मुंबईत मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगाब्लॉक, लोकलच्या एकूण ९३० फेऱ्या रद्द, बेस्टच्या जादा फेऱ्या
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले, तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू, अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार
पुण्यात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाला पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींच्या सर्व मालमत्तांची झडती घेणार पोलीस
महाराष्ट्र पेटतोय आणि मुख्यमंत्री आपल्या शेतात आराम करतायत, नाना पटोलेंचा हल्लाबोल...तर गड्या आपला गाव बरा, शिंदेंचा ठाकरेंना टोला.
मनुस्मृती आंदोलनात बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी आव्हाडांची माफी, आव्हाडांना भुजबळांचा पाठिंबा...तर, भुजबळांची भूमिका दुर्दैवी, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल...
डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटातील ९ कामगार अजूनही बेपत्ता, २५ ते ३० मानवी अवशेष सापडले, अवशेषांची डीएनए टेस्ट करुन बेपत्ता कामगारांचा शोध घेणार