TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 18 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तर काही वेळाआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखिल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटींमुळे चर्चांना उधाण.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, उत्तर-पश्चिममधील मतमोजणी वादानंतर वायकर राज ठाकरेंच्या भेटीला.
आज दिल्लीमध्ये भाजपची बैठक, बैठकीसाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने तसेच आगामी विधान सभा डोळ्यासमोर ठेवून भाजप कोअर कमिटीत चर्चा होण्याची शक्यता, याच सोबत राज्यात काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता.
आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित राहण्याची शक्यता..
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्तीनंतर, राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार.