TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
नगरपालिका निवडणूक प्रचारात मविआ नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा...शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसारखे बडे नेते प्रचरापासून दूर...तर महायुतीतील ट्रीपल इंजिन प्रचारात सुसाट...
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले ४३ जण महायुतीत...२६ पराभूत भाजपात, १३ अजितदादांकडे तर सात जणांच्या हाती धनुष्याबाण...सर्वाधिक १९ उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे...
अहिल्यानगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अपहरण करून मारहाण...सचिन गुजर यांना गाडीत टाकून मग मारहाण करून सोडलं...अपहरणकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू
मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल ११ लाख दुबार नावं, राज्य निवडणूक आयोगाची धक्कादायक माहिती, यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं मागितला वेळ
मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंगांच्या आयआयटी बाँबेचं मुंबई झालं नाही या वक्तव्याचा घेतला समाचार..
लाडकी बहीण योजनेवरू शिंदे-फडणवीसांमध्ये श्रेयवादाची चर्चा...देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट...तर योजना सुरू केल्याचा अभिमान असल्याचं शिंदेंचंही वक्तव्य...
सध्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतंय, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची खंत, तरुणाईकडे बदल घडवण्याची क्षमता असल्याचंही मत
सोलापूरच्या अनगर येथील उज्ज्वला थिटेंच्या अपीलावर आज पुन्हा सुनावणी...दोन्ही बाजूंचा होणार युक्तिवाद...अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दाखल केली होती याचिका...
राज्यातील एक हजार ८०० भजन मंडळांना साडेचार कोटी मंजूर...दरमहा प्रत्येकी २५ हजारांचं अनुदार मिळणार...हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणासाठी निधी वापरता येणार...