TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 30 May 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाडमधलं आंदोलन आव्हाडांच्या अंगलट, बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, ठाणे आणि नागपुरात आव्हाडांविरोधात आंदोलन
ससून रूग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर, पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं नाव घेणं भोवल्याची चर्चा
पुणे अपघातप्रकरणात खळबळजनक माहिती, अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेचं रक्त तपासणीला पाठवल्याचं अहवालात नमूद, रक्त मुलाच्या आईचं असल्याचा संशय
आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, उत्पादन शुल्कमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून धंगेकरांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार
विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच.. मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधरवर भाजपचा दावा, मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीनेही जाहीर केली उमेदवारी
मुंबई रस्ते सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यात व्हीजेटीआय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, सकारात्मक अहवाल देण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याचा दावा
राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात तीव्र टंचाई
राज्यात ११ हजार वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई, धरणांनी गाठला तळ, टँकरच्या संख्येने गाठला उच्चांक, तब्बल २५ जिल्ह्यात भीषण स्थिती
येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता, राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता
लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार, १ जूनला अखेरच्या टप्प्यात ८ राज्यात ५७ जागांवर मतदान, ४ जूनला एबीपी माझावर महानिकाल