सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025 एबीपी माझा लाईव्ह ABP Majha

Continues below advertisement

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 06 January 2025  एबीपी माझा लाईव्ह ABP Majha

बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार,जितेंद्र आव्हाड, वड्डेटीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार.

संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर  शिजला, वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर, नितीन भिक्कड यांच्यात बैठक झाली, बैठकीत ३ कोटीचं डील, सुरेश धस यांचा दावा.

हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, किंवा त्यांना बिन खात्याचे मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी, तर अजित पवारांचं धनंजय मुंडेजवळ काय अडकलंय, सुरेश धस यांचा सवाल.

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य, तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप. 

सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधानं करणं टाळायला हवं होतं, एकमेकांवर टीका करणे योग्य नाही, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया.

सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं नाहीतर महायुतीत मिठाचा खडा पडेल, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाणांचा इशारा, तर आपण अजितदादांवर टीका केली नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram