Top 100 Headlines : 6.30 AM : Superfast News : 09 August 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines :  10AM :  Superfast News : 09 August 2024 : ABP Majha

राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी पंढरपूरला १ हजार खाटांच्या रुग्णालयाला शासनाने दिली मंजुरी. 
नाशिक महानगरपालीकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशामक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42 टक्के जास्त अपसंपदा निष्पन्न,अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड.
 अंमळनेर ते विघनवाडी रेल्वेमार्गाची आज चाचणी.  नगर-बीड-परळी रेल्वे या मार्गावर दोन वर्षापुर्वी अहमदनगर पासून ते सोलापुरवाडी दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. 
वर्ध्याचे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे. मुंबईत नाना पटोले यांच्या उपस्थितीत केला काँग्रेसमध्ये प्रवेश. वर्धा विधानसभा उमेदवारीकरिता अर्ज सादर केल्याची माहिती
लातूरमध्ये कृषी सेवा केंद्रातील खतबियांचे नमुने  नापास. कृषी विभागाकडून कारवाई. कृषी विभागानं तपासणीसाठी घेतलेले 30 कृषी केंद्राचे नमुने नापास. त्यामुळे या 30 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करत कृषी विभागानं दिली सक्त ताकीद.
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मतदारसंघावर दावा केल्यानंतर भाजपने देखील केली उमेदवारीची मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram