Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 19 July 2024

Continues below advertisement

लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा. 

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र १० ते ११ या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. 

वाशिमच्या काटा आरोग्य केंद्राची इमारतीला अनेक ठिकाणी गळती,  उपचाराला आलेल्या रुग्णांना फटका, नवीन इमारत मंजूर होऊनही बांधकामाला सुरूवात नाही. 

सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक, 'उत्कृष्टता की और बढते कदम'या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण.

नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं, एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिकेला जाग, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथ रोगांवर नियंत्रण आणण्याचे निवेदन.  

जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ चारचाकी विहिरीत कोसळून अपघात, सात जणांचा मृत्यू, तर ६ जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखांची मदत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram