TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 15 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 15 June 2024 : ABP Majha

गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती , अपघाताने मारणेशी भेट झाली, गजा मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण.

खासदार निलेश लंके गुंड गजा मारणेला का भेटले, याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची लंके आणि गजा मारणे यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. 

खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारणं योग्य नाही, निलेश लंके- गजा मारणे सत्कारानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची टोला.

खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी मागितली माफी,  या विषयावर आता कोणी राजकारण करू नका,  रोहित पवारांची विनंती. 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा जरांगेंनी संशय व्यक्त केला होता. त्यांच्या आरोपाची चौकशी करावी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी.

मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजात असंतोष आहे, योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram