Special Report Mumbai Toll Naka :विधानसभेच्या तोंडावर मास्टरस्ट्रोक, मुंबईच्या वेशीवर टोलची कटकट बंद
Special Report Mumbai Toll Naka :विधानसभेच्या तोंडावर मास्टरस्ट्रोक, मुंबईच्या वेशीवर टोलची कटकट बंद
मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली (Mumbai Toll Waiver), तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे. तसेच नाशिक महामार्गाची टोल कंपनी दुरुस्ती करत नसल्याने पडघा टोलनाका बंद करण्याची मागणीही रईस शेख यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई एन्ट्री पाँइंटचे जे पाच मुख्य मार्ग आहेत, त्यांची दुरुस्ती टोल कंपन्यांकडून वेळेत कधीच होत नाही. तरीसुद्धा आजपर्यंत या पाचही मार्गावर वाहनांना टोल भरावा लागतो आहे. ही जनतेची लूट आहे. त्यासदंर्भात मी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून टोल रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नियमबाह्य टोल वसुलीचा प्रकार राज्यात सर्वत्र आहे. उदाहरण नाशिक महामार्गाचे घ्या. या महामार्गावर टोल कंपनी रस्त्याची दुरुस्ती करत नाही. तरीसुद्धा पडघा येथे टोल वसूल केला जात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात टोल कंपन्यांची अशी लूट सुरु आहे. ही सामान्यांची वाटमारी आहे. ती शासन कधी थांबवणार आहे, असा सवाल आमदार रईस शेख यांनी महायुती सरकारला केला आहे.