World Photography Day : Orion Nebula चे Photo चर्चेत, पृथ्वीपासून सर्वात जवळचा तेजोमेघ
World Photography Day: आज जागतिक फोटोग्राफी दिन. प्रत्येक फोटोग्राफर साठी हा महत्वाचा दिवस. 19 ऑगस्ट रोजी हा दिवस हा साजरा केला जातो यामागची काही कारणं आहेत. हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं, सोबतच त्यांनी काढलेल्या खास फोटोंना जगभरातील फोटो प्रेमींच्या समक्ष प्रस्तुत करणं.
कधी झाली या दिनाची सुरुवात
माहितीनुसार जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात तशी 2010 पासून झाली मात्र याचा इतिहास खूप जुना आहे. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे नावाच्या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. ही घोषणा झाल्यानंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. म्हणून हा दिवस ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ म्हणजेच जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो.