Tirupati : Cm Uddhav Thackery यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी निघालेल्या शिवसैनिकाचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी निघालेल्या शिवसैनिकाचा मृत्यू झालाय. सुमंत रुईकर असं त्यांचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत आणि त्यांच्या मित्राने तिरुपतीच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. या प्रवासादरम्यान सुमंत रुईकर यांना दोन तीन दिवस ताप होता. त्या दरम्यान त्यांना कर्नाटकातील रायचूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर कडवा शिवसैनिक हरपल्याची भावना व्यक्त होतेय. याआधी 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तिरुपतीपर्यंत पायी यात्रा केली होती. मात्र आता तिरुपतीला पोहोचण्याआधीच रुईकर यांना मृत्यूनं गाठलंय. रुईकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यामुळे या निष्ठावंत शिवसैनिकाच्या कुटुंबाचं पालकत्व शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का याकडं लक्ष लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola