Vaccination : COVISHIELD च्या दुसऱ्या डोसचा कालावधी कमी होणार? राजेश टोपे चर्चेसाठी दिल्लीत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत ते कोविशील्डच्या २ डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी करणार आहेत. त्यासोबतच परदेशात बूस्टर डोस दिला जातोय. त्याच धर्तीवर आपल्या देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसची चाचपणी सुरु करण्याची मागणीही करणार. याशिवाय मुलांच्या लसीकरणाबाबत तातडीनं सुरुवात होणं गरजेचं आहे. त्याबाबतही चर्चा करणार असल्याचंही टोपे म्हणालेत.