Kolhapur Tiger : कोल्हापूरच्या चंदगड-तिलारी काँझर्व्हेशन भागात पर्यटकांना वाघाचे दर्शन
Continues below advertisement
कोल्हापूरच्या चंदगड-तिलारी काँझर्व्हेशन भागात पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. गोव्याहून कोल्हापूरकडे परत येत असताना चंदगड मधील 6 तरुणांना पट्टेरी वाघ दिसला. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चंदगड मुख्य रस्त्यावर तरुणांना वाघ दिसला. त्यानंतर काही अंतरावर पुढे आल्यानंतर त्यांना भल्या मोठ्या गव्याचेही दर्शन झाले. या तरुणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे क्षण कैद केले. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचंही समोर येतंय.
Continues below advertisement