Kolhapur : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर रंगणार कोल्हापुरच्या मैदानी खेळांचा थरार
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावेळी कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचा थरार दिसणार आहे. यावेळी कोल्हापूरचं पथक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यासाठी स्वराज रक्षक शिवबाचा मावळा या आखाड्याच्या 14 जणांच्या पथकाची निवड करण्यात आलीय. त्यामुळे तलवारबाजी,लाठी काठी,भालाफेकीचा थरार दिल्लीत रंगणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूरला या परेडमध्ये स्थान मिळालं आहे.