Chandrapur Tiger : चंद्रपूरात पाईपमध्ये अडकला वाघ, वनविभागाची टीम वाघाच्या रेस्क्यूसाठी घटनास्थळी

पोंभुर्णा-गोंडपिंपरी मार्गावरील चेक-आष्टा येथे पाईपमध्ये अडकला वाघ. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी तर वनविभागाची टीम देखील वाघाच्या रेस्क्यू साठी दाखल, चेक-आष्टा या गावात आज सकाळी 11 च्या दरम्यान वाघाने बकरी मारली, त्यामुळे गावकऱ्यांनी वाघ हुडकून काढण्याचा प्रयत्न केला. दुपारी हा वाघ गावकऱ्यांना दिसला आणि लोकांपासून पळतांना वाघ या पाईपमध्ये शिरला, पाईप दुसऱ्या बाजूने बंद असल्याने वाघ पाईप मध्ये अडकून पडलाय, घटनास्थळी मोठी गर्दी आणि तणाव, पोंभुर्णा तालुक्यात गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जनावरं देखील वाघाने फस्त केली आहे. त्यामुळे गावकरी वाघाला जेरबंद करण्याच्या मागणी साठी अतिशय आक्रमक झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola