Tiger Attack: मोबाईलमध्ये वाघाला शूट करण्याची हौस जीवावर बेतली, Pilibhit मध्ये सफारी गाडीवर हल्ला
Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात (Pilibhit Tiger Reserve) जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या गाडीवर वाघाने हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. 'चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला'. पर्यटक वाघाला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत असताना, वाघ आक्रमक झाला आणि थेट जीपच्या दिशेने धावून आला. चालकाने तात्काळ गाडी पुढे नेल्यामुळे सर्व पर्यटक सुखरूप बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, वनविभागाने सफारी चालक आणि गाईड्सना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ही घटना इको-टुरिझम हंगामाच्या पहिल्याच दिवशी घडली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement