Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 3 NOV 2025 : ABP Majha
Continues below advertisement
मतदार यादीतील गोंधळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'मतचोरी करून जिंकणारे खरे नक्षलवादी आहेत,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपने पलटवार करत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघातच दुबार मतदार असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार, जयंत पाटील, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील यादीच आशिष शेलार यांनी सादर केली. दुसरीकडे, फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन SIT चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी सुषमा अंधारेंनी मोर्चा काढला असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यावरील ३० कोटींच्या खर्चावरून रोहित पवारांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement