Accidents in Maharashtra : राज्यात अपघातांची मालिका सुरूच, तीन ठिकाणी तीन जीवघेणे अपघात
Continues below advertisement
राज्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झालाय. इंदापूर-बारामती रस्त्यावर इनोव्हा कार आणि ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाला असून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापुरातही भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरच्या हातकणंगणलेजवळ एका थांबलेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी आहेत. हिंगोलीत सेनगाव ते गोरेगाव या मार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक सरपंच गंभीर जखमी झालेत.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Baramati Hingoli Accidents Three Accidents Hingoli Accident Kolhapur Accident Baramati Accident