Government Employee strike : कर्मचारी संपावर गेल्यामुळं शासकीय कामात अडथळा येण्यांची शक्यता

Continues below advertisement

राज्यातल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनही सहभागी झाली आहे. त्यामुळं शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णसेवेवर मोठा ताण पडणार आहे. या संपात तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील परिचारिकांसह क्ष किरण विभाग तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक वर्ग, सफाई कामगार आणि कक्षसेवक हे सर्व कर्मचारी संपावर गेल्यामुळं आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयातल्या सर्व सेवा या डॉक्टरांसोबत शिकाऊ परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्याकडून सुरू राहतील. या सेवा सुरू असताना त्यांना संबंधित कर्मचाऱ्यांची साथ मिळणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram