Third Wave in Control :मुंबईसह महाराष्ट्रासाठी तिसरी लाट ओसरली, मुंबईत काल 96 तर राज्यात 806 रुग्ण

Maharashtra Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशासह राज्यावरही कोरोनाचं सावट आहे. अशातच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमयाक्रॉननं सर्वांची धाकधूक वाढवली होती. तसेच, त्यापूर्वी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून देशासह राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. अशातच कोरोना असाच नियंत्रणात राहिल्यास मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola