Kapil Sharma Cafe Attack: 'गोळी कुठूनही येऊ शकते', लॉरेन्स बिश्नोई गँगची Kapil Sharma ला धमकी
Continues below advertisement
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांच्या कॅनडातील सरे येथील 'कॅप्स कॅफे'वर (Kaps Cafe) तिसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. 'आज जो तिसऱ्यांदा गोळीबार झाला आहे, त्याची जबाबदारी मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लों घेतो,' अशी पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi gang) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या टोळीने सोशल मीडियावर एक धमकीवजा पोस्ट शेअर केली असून, त्यात 'जे बॉलिवूडमध्ये धर्माविरुद्ध बोलतात, तेही तयार राहतील, गोळी कुठूनही येऊ शकते' असे म्हटले आहे. या वर्षातील जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वीच्या हल्ल्यांप्रमाणेच, यावेळीही गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही, परंतु कॅफेचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे कॅनडातील गुन्हेगारी आणि खंडणीच्या (extortion) घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement