Municipal Corporation Elections : महापालिकेत आता 5 नाही तर 10 स्वीकृत नगरसेवक

Continues below advertisement

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या मोठ्या महापालिकांमधल्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता पाचवरून दहावर नेण्यात आली आहे. नगरविकास विभागाचा हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा दहा प्रतिनिधी स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात. यापैकी जी संख्या छोटी असेल, त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. नजिकच्या काळात राज्यात एकूण २४ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाला राजकीय महत्त्व निर्माण झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram