Law & Order: 'नेत्यांची घरं सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय?', Eknath Khadse यांच्या घरी चोरी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावमधील (Jalgaon) घरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. याआधी, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. या घटनेमुळे 'राजकीय नेत्यांची घरं सुद्धा सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय?', असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथील निवासस्थानी असल्याने जळगावमधील घर बंद होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घरातून सोने, दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक, श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे. खडसे कुटुंबीयांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola