Eknath Khadse house Theft : एकनाथ खडसेंच्या घरी चोरी, जळगावात मोठी खळबळ

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्या जळगावमधील (Jalgaon) घरी चोरीची घटना समोर आली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (MoS Raksha Khadse) यांच्या पेट्रोल पंपावरही दरोडा पडला होता. ‘पोलीस हप्ते घेण्यात मशगूल आहेत,’ असा थेट आणि गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी चोरीच्या घटनेनंतर जळगाव पोलिसांवर (Jalgaon Police) केला आहे. चोरट्यांनी घरातील कपाटे तोडून सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचे खडसे यांनी सांगितले. या घटनेमुळे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. खडसे यांनी स्थानिक प्रशासनावर टीका करताना म्हटले की, 'मी बोललो की स्थानिक मंत्री वैयक्तिक टीका करतात, या प्रकरणात गांभीर्य नाही'. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola