Gondia: उच्चशिक्षित ध्येयवेड्या तरुणीची कहाणी, नक्षलग्रस्त भागात सामाजिक कार्य ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Nov 2021 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना नागपुरातील एका उच्च शिक्षित ध्येयवेड्या तरुणीने आर्थिक साक्षरतेचे धडे दिलेत.. अमृता देशपांडे असं या तरुणीचं नाव असून ती पेशाने कॉस्ट अकाऊंटंट आहे.. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा नागरिकांची फसवणूक होते.. त्यामुळे अमृताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीतून बँकेकडे या विषयावर मार्गदर्शन करण्याचा विडा उचललाय.. आजवर तीने ७०हून अधिक शाळांमध्ये यासंदर्भात विद्यार्थ्यानां मार्गदर्शन केलंय.. मुलांना शालेय जीवनात पैशांच्या बचतीची सवय लागावी, सोबतच बँकींगचे व्यवहार कळावे यासाठी ती शाळांमध्ये जात विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतेय..