Sambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणार
Sambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणार
छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळा छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य या संघटनेला नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह देखील देण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरा जाणार असून पक्षाचा समारंभपूर्वक स्थापना सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडणार पडतोय*
हे ही वाचा...
तप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. त्यांच्यामूळे काश्मिरमधील ३७० कलम रद्द झाले. आता ते पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हंटलेय. पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी - नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे. या नरकातून बाहेर पडण्याची वाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार आहेत. हे विचारच देशाला तारु शकतील.भगवा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज झाला पाहिजे. या देशाला म्लेंच्छ बाधा, गांधी बाधा झाली आहे. ही बाधा फक्त छत्रपतींचे विचारच दूर करतील असेही भिडे यांनी म्हटलेय. छत्रपतींनी अफझल खानला मारले नसते तर आज देशात एक मंदिर दिसले नसते. शिवाजी महाराजांना छत्रपती, राष्ट्रसंत यापेक्षा भगवान श्री शिवछत्रपती पदवी द्यायला हवी होती असेही भिडे म्हणालेत.