Wine : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर
किराणा दुकानातून वाइन विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी सध्या लांबणीवर टाकण्यात आली आहे. जनतेच्या प्रतिक्रिया आणि हरकती मागवून घेण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आंदोलन होणार आहे. यामुळे राज्य सरकारने दोन पाऊल मागे घेण्याचं ठरवलं आहे.