Solapur Airport : बोरामणी विमानतळासाठीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला
सोलापुरातील प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठीच्या जमीनाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळून लावला आहे. दक्षिण सोलापुरातील बोरामणी गावात नवीन विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत 573 हेक्टर जमीनीचे भूपसंपादन झाले आहे. याच विमानतळासाठी आवश्यक असलेली 33.72 हेक्टर जमीन ही वनविभागाच्या अखत्यारित आहेत. याच जमिनीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने वनविभागाकडे देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव वनखात्याच्या प्रादेशिक अधिकार समिती (आरईसी- रिजनल ईम्पॉवर्ड कमिटी) ने फेटाळून लावला आहे.