Nana Patole : भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर

Continues below advertisement

मुंबई : वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी तयार करण्याच्या ममता बँनर्जींच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिलं. 

यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "वेगवेगळ्या मार्गांचा वापर करुन भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात कांग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामान्यांच्या प्रश्नावर लढा दिला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी लढणं आवश्यक आहे. भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram