Rajarambapu Cooperative Bank कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी ED ने टाकले छापे
Continues below advertisement
राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण १४ ठिकाणी ED ने काल छापे टाकलेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित बँकेवर ईडीचे हे छापे होते. १० वर्ष जुन्या एक हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा ईडीकडून तपास सुरू आहे. आणि त्यासाठी हे छापे होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठ्या रकमा रोख स्वरूपात वळत्या केल्याचा आरोप आहे. आणि या घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सहभागी असल्याचाही ईडीला संशय आहे. या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या सीएच्या ऑफिसवरही ईडीने छापा टाकलाय.
Continues below advertisement