CM Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी तातडीची बोलावली बैठक
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.. दुपारी अडीच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला शंभूराज देसाई, उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसंच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि कायदेतज्ञ ही उपस्थित राहतील. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर वाटताल कशी असावी, याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.
Tags :
Maratha Reservation State Government Uday Samant Sahyadri Guest House Supreme Court Action Mode Shambhuraj Desai Chief Minister Eknath Shinde CHandrakant Patil Reconsideration Petition Emergency Meeting