Amit Shah यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला
Amit Shah : सत्तांतरांची भाकितं करण्याचं आणखी एक कारण म्हणजे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी होणारा विलंब.,... मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याची माहिती आता समोर येऊ लागलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याची माहिती मिळतेय. विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्यानं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार आहे.