Special Report : 97 वर्षीय आजींचा लढा यशस्वी, न्यायालयाच्या आदेशामुळे हक्काच्या घरात प्रवेश करणार
Continues below advertisement
Special Report : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या इमारतीत हक्काच्या घराचा ताबा मिळण्यास अडचणी येत असल्याने न्यायालयात धाव घेतलेल्या 97 वर्षीय वृद्ध महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने लोअर परळ येथील ग्रीनफिल्ड इमारतीतील सदनिका एका आठवडय़ात याचिकाकर्त्या महिलेच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्ट रिसिव्हरला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे वृद्ध महिलेला तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर तिच्या हक्काचे घर मिळणार आहे.
Continues below advertisement